‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका

  • Written By: Published:
‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका

Chitra Wagh : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिसासिक दिवसाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला यावरून राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भापज राममंदिराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतेय. अशातच आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजवर निशाणा साधला. राममंदिर (Ram Mandir) ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. त्याला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Jiya Shankar : ‘जिया’ धडक जाये! बॅकलेस गाऊनमध्ये वेडमधील अभिनेत्रीचं फोटोशुट 

‘उद्धवजी, तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.

चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं की, उद्धवजी… पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरू देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत. ज्यांनी कलम 370 हटवले, राम मंदिर उभारलं, सर्जिकल स्ट्राईक केला, G20 यशस्वी आयोजिली, महिला आरक्षण दिलं. या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केलाय आणि शिष्याने राज्यात असंख्य संकटावर मात करून पाच वर्ष यशस्वीपणे सरकार चालवून दाखवलं, असं वाघ यांनी लिहिलं.

मिलिंद देवरा काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याच्या तयारीत; पक्षप्रवेशासाठी भाजप अन् शिंदेंकडून पायघड्या

त्यांनी पुढं लिहिलं, देवेंद्रजींचे गुरू कोण आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. पण उद्धवजी, तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही… तुम्ही म्हणजे, राजकारणातल्या अपयशी शिष्याचं नामुष्कीजनक उदाहरण आहात. तुमचे वडील तर हिंदुत्वाचं चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्या वंदनीय विद्यापीठाचंही शिष्यत्व काही तुम्हाला सांभाळता आलं नाही, अशी टीका वाघ यांनी केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
आज माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा मी दिली होती. त्यासाठी शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो आणि वर्षभरानंतर न्यायालयाचा निर्णय आला. राम मंदिर ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. मला वाटेल तेव्हा मी रामाच्या दर्शनाला जाईल. राम मंदिर उभारणीत कारसेवकांचे योगदान मोठे आहे. कारसेवकांची हिंमत केली नसती तर आज मंदिर उभे राहिले नसते. झेंडे फडकवायला अनेकजण येतात, पण जेव्हा लढायची पाळी येते तेव्हा कुठे होतो, असा सवाल ठाकरेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube