PM Narendra Modi Visit in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (Modi) आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी कारागिरांच्या चित्र प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आलं आहे.
Google देणार मोठा धक्का! बंद करणार लाखो Gmail अकाउंट; लगेच करा हे काम
स्वावलंबी मैदानावर कार्यक्रम
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ होणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पी एम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना या योजनेचा प्रातिनिधिक स्वरुपात लाभ दिला जाणार आहे.
ई भूमिपूजन होणार
पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे अमरावतीच्या प्रकल्पात 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात तब्बल 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार विदर्भातील युवकांना मिळणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहती जवळील हा प्रकल्प होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई भूमिपूजन होणार आहे.
शेतकऱ्यांचं आंदोलन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वर्ध्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासह कर्जमाफी आणि दूध दराचे भाव वाढवावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. त्यासाठी वर्ध्याच्या गोपुरी चौक येथे शेतकाऱ्यांकडून हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले आहे. विविध मागण्यांचे पोस्टर घेत शेतकरी आंदोलनाला बसले आहे. शेतकऱ्यांना 24 तास विजमाफी द्यावी, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, सोयाबीनला 10 हजार तर कापसाला 15 हजार रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.