Download App

पगडी अन् डोकं..सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कवितेतून अमोल कोल्हेंचा सवाल…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा आज लोकमान्य टिळक(Lokmanya Tilak) पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी कवितेच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल अमोल कोल्हेंनी सरकारला करत धारेवर धरलयं. (pm narendra modi pune visit ncp mp dr amol kolhe lokmanya tilak thought poem)

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

सध्या सोशल मीडियावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची कविता लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय…असा परखड सवाल विचारत वेगळ्याच चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. मोदींचा पुण्यात गौरव होत असताना त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया त्या कवितेच्या माध्यमातून दिली आहे.

संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

कोल्हे कवितेत म्हणतात, पगडी म्हणाली डोक्याला, माझ्या मालकांची ओळख आहे ना तुम्हाला….ते असंतोषाचे जनक देशाला भरडणाऱ्या परकीय इंग्रजांविरुद्ध….तुमचे काय त्याच्यात देश भरडणाऱ्या महागाई विरुद्ध….गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमानं त्यांनी बघता बघता देश सोडला…..तोच देश जाती आणि धर्माच्या नावानं पेटवणाऱ्यांविषयी तुम्ही कधीच का नाही बोलतात….ते हसत हसत जाऊन आले मंडालेला…

…पण ते गरजले होते….सरकारचे डोके ठिकाणावर आहे का…..आता ही पगडी घालताना व्हावं एकदा चिंतन…..सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय…..सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय….खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या या कवितेनं आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमोल कोल्हे यांच्या कवितेला सोशल मीडियावर अनेकांनी लाईक्स, कमेंट केल्याचं दिसून आलं आहे. खासदार कोल्हे सध्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक घडामोडींकडे कवितेतून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांची पुणे भेट, त्यांना लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं गौरविले जाणे याला बाकीच्या गोष्टींचा संदर्भ देण्याचा प्रयत्न डॉ.कोल्हे यांनी या कवितेच्या माध्यमातून केल्याचे दिसून येत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Tags

follow us