Download App

कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी बजावले समन्स; ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

Kunal Kamra Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने

  • Written By: Last Updated:

Kunal Kamra Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने (Kunal Kamra) गाणं म्हटल्याने राज्यातील राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात कुणाल कामरा विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात बोलताना दिली आहे. तर आता कुणाल कामरा प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार, खार पोलिसांनी कुणाल कामरा याला दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये पोलिसांनी कुणाल कामरा याला 31 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा त्याच्या वकिलामार्फत खार पोलिसांच्या संपर्कात आहे. तर चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर होण्यासाठी कुणाल कामरा याने का आठवड्याची वेळ मागितली होती मात्र याची विनंती खार पोलिसांनी मान्य केली नाही. यानंतर खार पोलिसांनी कुणाल कामरा याला आयपीसी कलम 35 अंतर्गत दुसरे समन्स बजावले आहे. यापूर्वी पोलिसांनी मंगळवारी समन्स पाठवून चौकशीसाठी कुणाल कामरा याला हजर राहण्यासाठी सांगितले होते मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही.

प्रवाशांना दिलासा, एसटीकडून उन्हाळी गर्दीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 नवीन फेऱ्या

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी महायुतीने या प्रकरणात कुणाल कामरा याला अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तर महाविकास आघाडीकडून कुणाल कामरा याला समर्थन देण्यात येत आहे. तर कुणाल कामरा याने देखील या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. मी माफी मागणार नाही पण न्यायालयाने माफी मागण्यास सांगितली तर माफी मागेन असं कुणाल कामरा याने एका सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….

follow us