‘त्या’ खासदारांना दिल्लीतही पोलिस संरक्षण, बंगल्यासमोर नो एंट्री चे फलक अन्…

Omraje Nimbalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांना आता दिल्लीत देखील पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवासस्थानांच्या परिसरात नो एन्ट्रीचे फलक लावण्यात आले आहेत.

ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा राजकीय धक्का देत सहा खासदार फोडले आहे. या खासदारांनी सुरुवातीला स्वतंत्र गटाची स्थापना केली होती तर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगरनंतर संपूर्ण राज्यात या सहा खासदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोनलने सुरु करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सहा खासदारांना ठोका असा इशारा दिल्याने महाराष्ट्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. तर आता दिल्ली पोलिसांकडून देखील या सहा खासदारांना सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आले असून निवासस्थानांच्या परिसरात नो एन्ट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच खासदारांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही.

पासपोर्ट चोरी अन् 14 जूनला हत्येचा प्रयत्न पण…, केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा

ठाकरेंची साथ सोडणारे खासदार

ऑपरेशन टायगरअंतर्गत यवतमाळ – वाशीमचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.  ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. एनडीएमध्ये महाराष्टातून सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष आता एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष असणार आहे. तर ठाकरे गटाची खासदारांची संख्या 9 वरून 3 वर आली आहे.

Exit mobile version