पासपोर्ट चोरी अन् 14 जूनला हत्येचा प्रयत्न पण…, केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाची लोहगड येथे हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाची लोहगड येथे हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  सुरुवातीला केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावरुन खाली कोसळल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र केतन हा एक नियमित ट्रेकर असल्याने अचानक त्याचा पाय घसरणे संशयास्पद वाटत असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे कुटुंबियांकडून करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सखोल तपासाला सुरुवात केली.

तपासात सिया गोयल (Siya Goyal) हिचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी (Chetan Chaudhary) नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच सियाला केतनसोबत (Ketan Agrawal) लग्न करायचे नव्हते अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे सिया आणि चेतनने मिळून केतनला वाटेतून हटवण्याचा पूर्वनियोजित कट रचला असल्याचा खुलासा तपासात झाल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बीएनएस कलम 103 आणि 61 (2) अंतर्गत खुनाचा गुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देखील दिली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दोन अपयशी प्रयत्न

तर दुसरीकडे पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा देखील झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री – वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. यासाठी ते पुण्यातून मुंबईकडे निघाले होते. विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट अचानक गायब झाल्याने हा दौरा रद्द झाला होता. केतन बालीला जाऊ नये यासाठी सियाने त्याचा पासपोर्ट कुठेतरी लपवून ठेवला होता अशी माहिती पोलिसांना तपासात समोर आली. यानंतर 14 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र त्या दिवशी परिस्थिती अनुकूल नसल्याने सियाने प्रयत्न केला नाही.

18 जूनला घातपात

19 जून रोजी सियाचा वाढदिवस असल्याने 18 जून रोजी सिया आणि केतन लोहगडला ट्रेकिंगसाठी गेले होते. माहितीनुसार, 18 जूनला लोहगडवर ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह सियाने धरला होता. 18 जून रोजी ठरलेल्या कटानुसार, सियाचा प्रियकर चेतन चौधरी देखील लोहगड किल्ल्यावर पोहचला होता. ट्रेकिंग दरम्यान केतन पुढे असताना सिया आणि पाठीमागून आलेल्या चेतनने केतनला खोल दरीत धक्का दिला. केतन 350  फूट खोल दरीत पडल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली-

काय म्हणाले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल ? 

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र या प्रकणात सखोल तपास करत असताना पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली. सिया आणि चेतन चौधरीचे प्रेमसंबंध असल्याने सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे सिया आणि चेतनने केतनच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.

follow us