Download App

प्रांजल खेवलकरबद्दल फॉरेन्सिकचा धक्कादायक अहवाल; वाचा, एकनाथ खडसे काय म्हणाले?

दोन महिन्यांनंतर आता खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळालाय. दरम्यान आता, पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

काही दिवसांपूर्वी पुण्यातलं रेव्ह पार्टी प्रकरण चांगलच गाजलं. (Drugs) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई यामध्ये असल्याने त्या प्रकरणाला राजकीय वळनही लागलं. दरम्यान, दोन महिन्यांनंतर आता खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळालाय. दरम्यान आता, पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खेवलकर यांच्या जामिनानंतर आता या प्रकरणात त्यांचा फॉरेन्सिक अहवालही पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलंच नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता प्रांजल खेवलकर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

खडसेंना दिलासा!प्रांजल खेवलकरांना कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी 2 महिन्यांनतर जामीन मंजूर

मला आधीपासूनच माहिती होतं, त्यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सेवन केलेलं नाही, सहा जणांमध्ये ड्रग्स पार्टी होऊच शकत नाही, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत असं दाखवण्यात आलं, शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, असा मोठा दावा या प्रकरणावर बोलताना खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण तापणार असं चित्र निर्माण झालं आहे.

त्याचबरोबर प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि ते आता बाहेर आहेत. त्यांनी ड्रग्स सेवन केलं नसल्याचा अहवाल देखील समोर आला आहे. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात रेव्ह पार्टी आणि ड्रग्स सेवन केल्याचं वातावरण निर्माण केलं ते चुकीचं होतं. आता अहवाल समोर येतोय, त्यामुळे या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता, असं दिसत आहे. न्यायालयात सर्व बाबी समोर येतील, असं खडसे म्हणाले आहेत.

follow us