… तर जावयाची बाजू घेणार नाही, फाशी द्या; एकनाथ खडसेंचे चाकणकरांना प्रत्युत्तर

… तर जावयाची बाजू घेणार नाही, फाशी द्या; एकनाथ खडसेंचे चाकणकरांना प्रत्युत्तर

Eknath Khadse On Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) पुण्यातील रेव्ह पार्टीत अडकल्याने या प्रकरणात आता राजकारण चांगलेच तापले आहे. या एका बहुउदेशीय संस्थेने राज्य महिला आयोगाकडे (State Women Commission) तक्रार देखील दिली आहे. तर दुसरीकडे आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील माध्यमांशी बोलताना प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपावर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर देत दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत मात्र त्या एकाद्या पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे बोलत आहेत. त्यांनी जी माहिती सांगितली आहे ती माहिती पोलिसांनी सांगितली पाहिजे होती. रुपालीताई आणि रोहणीताई यांचे मैत्रीचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे रुपालीताई चेकाळून बोलत आहेत असं माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले. तसेच जी माहिती खाजगी आहे ती माहिती सार्वजनिक करु नका. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस याबाबत माहिती देतील असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

जावयाची बाजू घेणार नाही

तसेच जर दोषी असेल तर आपण आपल्या जावयाची बाजू घेणार नाही, जर जावई दोषी असेल तर त्याला फाशी द्यायला हवी मात्र हा बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकाही मुलीची त्यांच्याविरोधात तक्रार नाही, त्याचा खासगी आयुष्य आहे. या प्रकरणात एसआयटी पेक्षा केंद्राच्या एखाद्या तपास यंत्रणाद्वारे तपास करण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी एकनाथ खडसे यांनी केली. तसेच रुपालीताईंनी लोढा प्रकरणातही लक्ष घालावे असेही यावेळी खडसे म्हणाले.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांनी सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार आज सानवी संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. भीषण आणि भयावह अहवाल आहे. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन, गांजा, 10 मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. तर घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्र फोटो आणि व्हिडिओ आढळले असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Asia Cup 2025 : भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार? जाणून घ्या सर्वात मोठी अपडेट 

तसेत प्रांजल यांनी मुलींना पिच्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवले आणि त्यांच्यासोबत लैगिक अत्याचार केला असल्याची माहिती तपासात समोर आली असल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube