Download App

चव्हाणांना फटकारलं, राऊतांनाही ओढलं; एकनाथ शिंदेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर देसाईंचा संताप

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत. या चर्चांवर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोठा राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील, त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

अलीकडे पृथ्वीराज चव्हाण संजय राऊतांना भेटलेले दिसतात. त्यामुळे त्यांना राऊतांचा वाण नाही पण गुण लागलेला दिसतो. संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळी सरकार जाणार असे बोलत असतात. तसे चव्हाण बोलले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांना निधी मिळाल्यानंतर ते एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. त्यामुळे आमच्या घरात वाकून पाहण्याची गरज नाही, अशा शब्दांत देसाई यांनी चव्हाणांना सुनावलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष सर्व गोष्टी तपासूनच निर्णय घेतील. ता निर्णय आम्हाला मान्य असेल. संजय राऊत यांच्या संगतीत राहून पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्य वर्तवण्याचं काम करू नये असा सल्ला देसाई यांनी दिला.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की, अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे म्हणूनच ते त्यांच्यासोबत गेले आहेत. तसेच येत्या 10 ऑगस्टला राज्यात पुन्हा भूकंप होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चव्हाण म्हणाले की, पक्षांतर करण्यासाठी ज्या खोक्यांची चर्चा झाली त्यातील रक्कम ही आमदारांना विकासकामांच्या निधीतून देण्यात आली असल्याची चर्चा आहे. असं चव्हाण म्हणाले.

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही त्याची माहिती काढत आहोत. असं चव्हाण म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी मला मिळालेल्या माहितीनुसार आणि राजकीय अभ्यासानुसार अंदाज वर्तवला होता की, अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे म्हणूनच ते त्यांच्यासोबत गेले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसबा अध्यक्षांना 90 दिवसांत म्हणजे 10 ऑगस्टच्या आसपास घ्यायला सांगितला आहे. तो त्यांना घ्यावा लागेल. त्यामुळे 10 ऑगस्टला त्यावर निर्णय घेईल. असा माझा अंदाज आहे.

Tags

follow us