Sanjay Raut criticized Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल औरंगदजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपला ठाकरे गटावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली असून भाजप नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या मुद्द्यावर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली होती. त्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंचा बचाव करत बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.
बावनकुळे या माणसाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. बावनकुळेंना महाराष्ट्र समजत नाही. हा प्रश्न त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन औरंगजेबाला विचारावा. त्यांच्याच राज्यात आहे ना कबर, अशा शब्दांत राऊत यांनी बावनकुळे यांना फटकारले.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र
आदित्य ठाकरेंनी बोलणे टाळले
याच मुद्द्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही प्रश्न विचारला होता. मात्र, त्यांनी सफाईदारपणे उत्तर देणे टाळले. ठाकरे म्हणाले, मला आताच माध्यमांकडून ही माहिती समजत आहे. मला याची सविस्तर माहिती घेऊ द्या, मगच मी त्यावर काही बोलू शकेन.
उद्धव ठाकरेंनीच उत्तर द्यावं – बावनकुळे
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती असल्याने भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी केली आहे. उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचे औरंगजेबाच्या कबरीवर जाणे मान्य आहे काय, हे स्पष्ट करावं असे म्हणत बावनकुळे यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते.
औरंगजेबाच्या कबरीला भेट : प्रकाश आंबेडकर- इम्तियाज जलील यांचे सुर पुन्हा जुळले…