Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेनेचा वर्धापन अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. उद्याच (19 जून) शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कायंदे यांचा फोन मागील काही तासांपासून नॉट रिचेलबल होता. महाशिबिराच्या दिवशी संबंधित आमदार कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचीही माहिती आहे.

मोदी सरकारच्या हालचाली अन् मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक; ‘या’ महिन्यात मिळणार मुहूर्त

मनिषा कायंदे यांच्यावर बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. त्या लहानपणी आपल्या वडिलांबरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात असत. त्यांचे वडिल ग्रामीण भागात नेत्र शिबिरे आयोजित करायचे त्यावेळी त्या त्यांना मदत करत असत. त्यामुळे कायंदे यांना राज्याच्या ग्रामीण भागाची चांगली माहिती आहे. सन 1992 मध्ये कायंदे स्वतः त्यांच्या वडिलांबरोबर अयोध्येला कारसेवेसाठी गेल्या होत्या.

भाजपपासून राजकारणाची सुरुवात

कायंदे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भाजपमधून केली होती. 25 ते 30 वर्षे त्या भाजपमध्येच होत्या. 1997 मध्ये त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सन 2009 मध्ये त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढली. मात्र, येथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी मनसेची लाट जोरात होती. तरीही त्यांचे काम सुरुच होते. या काळात त्यांनी जवळपास सव्वाशे आंदोलने केली.

सांगली हादरली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भररस्त्यात निर्घृण खून; हल्लेखोरांनी अख्खी बंदूकचं केली रिकामी

त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दोन वर्षांनंतर 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने मोठी जबाबदारी देत पक्षाचे प्रवक्तेपद दिले. यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेचे तिकीट दिले. विधान परिषदेवर जाणे हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट होता असे कायंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube