सांगली हादरली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भररस्त्यात निर्घृण खून; हल्लेखोरांनी अख्खी बंदूकचं केली रिकामी

सांगली हादरली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भररस्त्यात निर्घृण खून; हल्लेखोरांनी अख्खी बंदूकचं केली रिकामी

सांगली : येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालण्यात आल्या. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (17 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli crime, NCP Worker Nalasab Mulla shoot and dead in Sangli City)

मृत नालसाब मुल्ला हा मोका टोळीतील कुख्यात गुन्हेगार आणि खासगी सावकार मुश्ताक मुल्ला याचा भाऊ होता. नालसाब याच्यावरही मोकांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान, खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पूर्वीचा बाद किंवा अन्य कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

औरंगजेबाच्या कबरीला भेट : प्रकाश आंबेडकर- इम्तियाज जलील यांचे सुर पुन्हा जुळले…

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, नालसाब मुल्ला याचे बाबा चौकात निवासस्थान, कार्यालय व बांधकाम साहित्य विक्रीचा डेपो आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास निवासस्थानाबाहेर असलेल्या वाचनालयाजवळ तो थांबला होता. त्यावेळी अंधारात दुचाकीवरून दोघे जण तेथे आले अन् क्षणात त्यांनी मुल्लाच्या दिशेने गोळीबार सुरु केला. मुल्लाच्या छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्यानंतर अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे.

दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला याच्या घरातील व परिसरातील नगरिक धावले. तेव्हा मुल्ला गंभीर अवस्थेत होता. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबाराचे वृत्त समजताच मुल्ला याचे नातेवाईक, मित्र आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. मुल्ला याच्या खुनाची माहिती मिळताच अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी भेट दिली.

नगरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न; ख्रिश्चन महिलांनी घरात येऊन कपाळावर तेल लावलं, विरोध केल्यानंतर म्हणाल्या…

काही दिवसांपूर्वी शहरातील मध्यवस्थीतील महावीर कॉलनीतील युवकाचा खून झाला होता. शंभरफुटी रस्त्यावरील जॉय ग्रुप या टोळीतील अकरा जणांवर तीन वर्षांपूर्वी मोका लावला होता. त्यात याचा समावेश होता, असे पोलिसांनी सांगितले. सध्या तो जामिनावर बाहेर होता. खुनाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, मात्र पूर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube