नगरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न; ख्रिश्चन महिलांनी घरात येऊन कपाळावर तेल लावलं, विरोध केल्यानंतर म्हणाल्या…
धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याचा प्रकार अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात उघड झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील दौंड इथल्या तीन महिलांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांकडून तीन महिलांना अटकही करण्यात आली आहे.
तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं…
नेमकं काय घडलं?
श्रीगोंद्यातल्या काष्टी इथं प्रकाश मदरे त्याच्या आई आणि भावासह राहतो. शनिवारी सकाळी तीन महिला मदरे यांच्या घरात येत त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबत माहिती मदरे यांना सांगितली. त्यानंतर तुम्ही ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा, तुमच्या सर्व अडचणी दूर होण्याबाबत सांगितलं. त्यानंतर कपाळावर तेल लावून आमचं धर्मांतरण करण्यासाठी बळजबरी करु लागल्या.
‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल
मात्र, आम्ही धर्मांतर करण्यासाठी विरोध केला असता तुम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली नाहीतर तुमचे वाईट होईल, असं तीन महिलांनी सांगितले. या प्रकारानंतर प्रकाश यांनी याबाबत प्रतिक पाचपुते यांना बोलावून घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर पाचपुते यांनी महिलांविषयी पोलिसांकडे माहिती देत पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता चौकशीत संशयास्पद बाबी आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रकाश मदरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नम्रता व्यंकटेश वारनसे, शारदा आकाश सौंदडे वैशाली सुनील पवार, अशी या महिलांची नावे असून धर्मांतरामागे आणखी कोणी आहे का? याबाबत तपास पोलिस घेत आहेत.