तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं…

तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं…

औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही नोकऱ्या करीत होतात की नाही हे आधी सांगा, आम्ही तर दरबारात साधं चोपदारही नव्हतो, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाजाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकरालं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी काल छत्रपती संभाजीनगरमधील औरंजेबाच्या कबरीला भेट दिली.. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता 698 शस्त्रक्रिया; चौकशी समितीचा ठपका

प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वत:चे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, दरबारात नोकऱ्या करत होते की नाही, हे सांगावं. आम्ही तर दरबारात साधं चोपदारही नव्हतो, त्यामुळे लोकांना शहाणपणा शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा. तसंच लोकांच्या श्रद्धेचा मान ठेवला पाहिजे असंही ते म्हणाले.

मोठी बातमी : पुण्यात खळबळ! वारजेत 21 वर्षांच्या मुलावर भरदिवसा गोळीबार

आम्ही जे शिबीर घेतलं त्यासाठी राज्यातून कार्यकर्ते इथं आलेले आहेत. एकाच ठिकाणी आम्ही सोय करू शकत नव्हतो, ट्रस्टीशी बोललो होतो, काही जणांची याठिकाणी राहण्याची सोय करा, असं आम्ही म्हटलं. त्यांनी ते मान्य केलं म्हणून ट्रस्टीला भेट देण्यासाठी आज आलो होतो. भद्रा मारुती मंदिराचे नवीन बांधकाम बघत मंदिराला भेट दिली. आता प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

दरम्यान, अनेकदा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाली मात्र, युती झालीय की नाही याबाबत अद्याप तरी अस्पष्टच आहे. ठाकरे आणि आंबेडकर दोघेही सोबत दिसून येत आहेत. आता उद्धव ठाकरेंना आंबेडकरांचे औरंजेबाच्या कबरीवर जाणे मान्य आहे काय? हे स्पष्ट करावं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

अमरावती महानगरपालिकेत परीक्षा न देताच मिळणार नोकरी, महिन्याला 75 हजार रुपये पगार

मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन चांगलचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर केल्याने एमआयएमचे खासदार जलील यांच्या नेतृत्वात याविरोधात साखळी उपोषण, आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आले, त्यानंतर अहमदनगरच्या मुकूंदनगरमध्येहीॉ संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे बॅनर झळकळ्याचे दिसलं, होतं. त्यावरुन राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

तर कोल्हपुरातही औरंजेबाजचे संमर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर झळकल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन गटांत दगडफेकही झाली होती. त्यामुळे राज्यात वातावरण तापलेलं असतानाच प्रकाश आंबेडकरांनी औंरगेजबाच्या कबरील भेट दिल्याने नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube