Download App

मोठी बातमी! पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट? दिल्ली पोलिसांचा अहवाल कोर्टात

पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवााल दिल्ली पोलिसांनी कोर्टात दाखल केला.

Pooja Khedkar Disability Certificate : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar) देशभरात गाजलं. बोगस कागदपत्रांची पूर्तता करून युपीएससी रँकची नोकरी मिळवली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर (UPSC) पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर आले. तिच्या नोकरीवर गदा आलीच शिवाय गुन्हाही दाखल झाला. आता या प्रकरणात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रा संदर्भात एक अहवाल दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला आहे. गुन्हे शाखेने अनेक धक्कादायक बाबी या अहवालात नमूद केल्या आहेत.

मोठी बातमी! UPSC करणार उमेदवारांचं आधार व्हेरिफिकेशन; खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

या अहवालातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं दावा या अहवालात करण्यात आला आहे. खेडकरने प्रमाणपत्रातील नावातही बदल केला आहे. सन 2022-2023 मधील सिव्हिल सेवा परीक्षेत पूजा खेडकरने खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे या अहवालात म्हटले आहे. प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलेले नाहीत असे पूजा खेडकरने सांगितले होते अशी माहिती पूजा पोलिसांनी न्यायालयात दिली.

पूजा खेडकरने अहमदनगर मेडिकल प्रशासनाचे दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. पण, दुसरे प्रमाणपत्र आपण दिले नसल्याचे मेडिकल अॅथॉरिटीने न्यायालयात सांगितले. पहिलं प्रमाणपत्रात पूजा खेडकरची दृश्यमानता कमी असून वीस टक्के मानसिक आजार असल्याचे या प्रमाणपत्रात म्हटले होते. हे प्रमाणपत्र पूजा खेडकरने 2022 मध्ये सादर केले होते. यानंतरच्या दुसऱ्या प्रमाणपत्रात पूज खेडकऱ्याच्या उजव्या कानाची ऐकण्याची क्षमता दहा टक्के, दृश्यमानता 40 टक्के कमी असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यांना 15 टक्के लोकोमोटर डिसॅबिलिटी (सांध्याचा आजार) असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही: पूजा खेडकरकडून आरोपांचे खंडन

दरम्यान, या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता दुसरे प्रमाणपत्र आपण दिले नसल्याचे अहमदनगर मेडिकल अॅथॉरिटीने न्यायालयात सांगितले. त्यामुळे दुसरे प्रमाणपत्र पूजा खेडकरने बनावट तयार केले का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दिल्ली पोलिसांच्या या अहवालामुळे पूजा खेडकरचे आणखी कारनामे समोर आले आहेत. तसेच यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

follow us