IAS Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे.
माहितीनुसार, 25 जुलैपर्यंत दिलीप खेडकरांना पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. दिलीप खेडकर यांना 25 जुलैपर्यंत पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे 18 जुलै रोजी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली होती. जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणात पोलिसांनी त्यांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात दिलीप खेडकर अधिकारी होते तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) निवडणूक देखील लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 40 कोटींची मालमत्ता दाखवली होती. माहितीनुसार, दिलीप खेडकर आयएएस राहिले असून सेवेत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना दोनदा निलंबित करण्यात आलं होते. तर 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या संचालकपदावरून ते निवृत्त झाले होते.
तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यांची UPSC तून निवडही रद्द करण्यात आली आहे तर दुसऱ्या प्रकरणात सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले
यूपीएससीकडून चौकशी सुरु
समोर आलेल्या माहितीनुसार, अनेकवेळा पूजा खेडकर यांनी नावे बदलून यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी कधी स्वतःचा नाव बदलून तर कधी आईचे नाव बदलून तर कधी वडिलांचे नाव बदलून परीक्षा दिली होती. याच बरोबर त्यांनी स्वतःचा फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी आणि फोन नंबर बदलून देखील परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे.