Download App

पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द! सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार?

Pooja Khedkar चे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.

Pooja Khedkar’s Non Creamy Layer certificate cancelled Will it affect the Supreme Court hearing : वादात सापडलेल्या ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरचे (Pooja Khedkar) नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आवश्यक असतं. त्यासाठी पूजा खेडकरने  नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवलं होतं. पण हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द झाल्याने तिला ओबीसी आरक्षण मिळवण्याचा अधिकार नव्हाता हे आता स्पष्ट झालं आहे.

पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा अडचणीत; बन मस्कामध्ये काच त्यानंतर आता अंडाभुर्जीमध्ये आढळलं झुरळ…

युपीएससीच्या परिक्षेमध्ये ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं. मात्र तिचे इतर प्रमाणपत्र वादग्रस्त ठरल्यानंतर केंद्र सरकारने तिच्या नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या प्रकरणी चौकशी केली. यामध्ये त्यांना आढळलं की, पूजा खेडकर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट घेण्यासाठी पात्र नाही.

नराधमांची क्रूरता! महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 वार, गळा 20 सेमी खोल कापला, श्वसननलिका फाडली…

याचं कारण म्हणजे पूजा खेडकरसह (Pooja Khedkar) तिच्या आई-वडिलांच्या नावावर असणारी मालमत्ता ही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवण्याच्या अटींपेक्षा अधिक आहे. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किमान 8 लाख उत्त्पन्न असणं आवश्यक असतं. पण जेव्हा पूजा खेडकरचे वडिल निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी जे अॅफिडेव्हिट दिले होते. त्यावर त्यांची मालमत्ता ही 40 कोटी रूपये एवढी होती. त्यानंतर आता पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.

एसटीने चालकांचा विचार करावा; आर्थिक व शारीरिक त्रास टाळण्यासाठी फेर मार्ग सर्व्हेक्षणाची मागणी

दरम्यान पूजा खेडकर (Pooja Khedkar) हीने ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळी युपीएससी परिक्षा दिली होती. त्यात अपयश आल्याने तिने दिव्यांग प्रमाणपत्र दाखवत देखील परिक्षा दिली होती. मात्र दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद झाल्यानंतर पूजाला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे. त्यावर या कारवाईचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us