position of the Nationalist Party Sunil Tatkare spoke clearly about the post of Guardian Minister of Nashik and Raigad : राज्यामध्ये भाजप आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी वादात सापडलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. मात्र यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. यावरून वारंवार वाद विवाद निर्माण होत असतात. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महिन्याभरात पवार दुसऱ्या पक्षात जातील अन् सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…; शिरसाटांचे मोठे विधान
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामधील समावेश आणि नाशिकचं पालकमंत्री पद याचा काहीही संबंद नाही. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत त्यावेळी जो काही निर्णय झाला आहे. त्यामुळे त्यावेळी याो दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. पण याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण सरकारमध्ये हे निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्व मिळून घेत असतात.
किश्तवाडमध्ये चकमक! दोन अतिरेक्यांना कंठस्नान; एक जवान शहीद, ऑपरेशन त्राशी सुरुच..
नेमकं काय झालं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगडसाठी आदिती तटकरे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. मात्र यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रस्ता रोको केला. त्याचबरोबर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून देखील दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदा बाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.