बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळं पावसाची शक्यता; घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

Rain Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

News Photo   2026 09 21T162515.744

Possibility of rain continues in Maharashtra.

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच (Rain) महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कायम आहे. राज्यातील अनेक भागांत दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत असला तरी काही जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र, पावसाचे हे स्वरूप सर्वदूर नसून आज 21 सप्टेंबर रोजी काही भागांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागांसह हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून माघार घेतली आहे. जैसलमेर, नागौर, सीकर, रोहतक, पतियाळा आणि गुरुदासपूर या भागांतून मॉन्सूनच्या परतीची सीमा पुढे सरकली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित भागांसह सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांतूनही मॉन्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी

दरम्यान, आज सातारा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये विजांसह हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. उद्या रायगड, सातारा घाटमाथा आणि सोलापूरला जोरदार पावसाचा येलो अलर्ट असून, अन्य अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र सध्या पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. 21 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 वाजता हे क्षेत्र पश्चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर होते. पुढील 24 तासांत त्याची तीव्रता वाढून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी तीव्रता वाढत हे हवामान क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकून 23 सप्टेंबरच्या सकाळच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

Exit mobile version