दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar; मराठवाड्यातील शेतीची पाहणी केल्यानंतर रोहित पवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
Rohit Pawar on Marathwada Drought: राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत. अनेक ठिकाणी तर दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मराठवाड्यातील शेतीची पाहणी केली. या परिस्थितीमुळे पुढील दहा महिने शेतकऱ्यांना जगण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाराखे विकास कामे थांबवा आणि विकास कामांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे वळवा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?
रोहित पवारांनी धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी खरिपात 75 टक्क्यांहून जास्त नुकसान झाले तर, रब्बी हंगामानेही मान टाकली. शिवाय जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न उद्भवू लागला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
एसटी महामंडळात येणार 200 व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही (Sharad Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) दुष्काळ जाहीर करावा, अशी पत्राद्वारे मागणी केली. रोहित पवार म्हणाले की, एखाद्या प्रश्नावर शरद पवार प्रथम सरकारला पत्र लिहून त्यावर तोडगा काढण्यासाठी वेळ देतात. मात्र, त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर ते आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरतात, हा त्यांचा पूर्वीपासूनचा इतिहास आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आम्ही पाहणी दौऱ्याला सुरुवात केली असून, या पाहणीचा सविस्तर अहवाल त्यांना सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; वरुण सरदेसाईंचे विरोधकांना थेट आव्हान
दरम्यान, आज अजित पवार (Ajit Pawar) असते तर ते नियम आणि अटींमध्ये अडकून राहिले नसते, अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेले आणि लोकांसाठी काम करणारे नेतृत्व होते. सध्याच्या महायुतीतील नेत्यांना मात्र जनतेच्या प्रश्नांपेक्षा पक्षफोड आणि आमदार-खासदारांच्या फोडाफोडीत अधिक रस असल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.