Download App

धाकधूक वाढली, GBS चा आजारही वाढला; सरकार यात्रांवर निर्बंध आणणार?

आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याचा विचार करू अशी माहिती केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

Guillain Barre Syndrome : ज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्ह्यांतही रुग्ण आढळले आहेत. या आजाराने काही जणांचा मृत्यूही झाला आहे.  आजार संसर्गजन्य नसला तरी रग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता आरोग्य विभागाने काही कठोर निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे.

हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याचा विचार करू अशी माहिती केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना राज्यमंत्री जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात जीबीएस आजाराची काय स्थिती आहे याची माहिती दिली. 

मोठी बातमी! मुंबईत GBS आजाराचा पहिला बळी; 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कोरोनाच्या काळात अशाच पद्धतीने निर्बंध होते. सध्या राज्यभरात यात्रा आणि सोहळ्यांचा काळ सुरू झाला आहे. या उत्सवांसाठी मोठी गर्दी होते. परंतु, या गर्दीच्या माध्यमातून जीबीएस आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात या आजाराचे रुग्ण वाढत असले तरी आता देशाच्या अन्य भागांतही रुग्ण सापडू लागले आहेत. याचा विचार करून कदाचित यात्रांवर निर्बंधांची शक्यता मंत्री जाधव यांनी बोलून दाखवली.

गर्दीमुळे जीबीएसचा संसर्ग होत असेल तर संबंधित डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रांवरील निर्बंधांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असेही जाधव यावेळी म्हणाले.

जीबीएस संसर्गजन्य नाही

दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.

नगरकरांची डोकेदुखी वाढली! जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव, सिव्हिल सर्जन म्हणाले…

परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.

follow us