Download App

नगर शहरानंतर विविध कार्यालयांचं नामांतर; पोस्ट ऑफीसचे नावही अहिल्यानगर केलं जाणार

Post Office चे अहमदनगर कार्यालयाचे देखील नाव अहिल्यानगर केले जावे. यासाठी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

Post Office will be renamed after Nagar City renamed Ahilyanagar : गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्वीचं अहमदनगर आणि आता शहराचं नामांतर झालं ते अहिल्यानगर. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव या जिल्ह्यामध्ये असल्याने या शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याची मागणी होत होती. त्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली.

मोठी बातमी! पुण्यातल्या सिग्नलवर अश्लील चाळे; दोन मित्रांमधील एका मित्राला सत्र न्यायालयाकडून…

त्यानंतर आता शहरातील विविध कार्यालयांची नावे देखील बदलण्यात येत आहेत. यामध्येच टपाल विभागाचे अहमदनगर कार्यालयाचे देखील नाव अहिल्यानगर केले जावे. यासाठी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये ज्याप्रमाणे शहराचे नाव बदललं त्यानंतर हळूहळू विविध कार्यालयांचे नामांतर होत असताना पोस्ट ऑफिसचे नाव देखील अहिल्यानगर केले जावं अशी मागणी या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार अन् हत्या; आदित्य ठाकरे ते सुरज पांचोली अनेकांवर धक्कादायक आरोप करत वडिलांची याचिका

त्याचबरोबर कार्यालयावरील पाट्या तसेच विविध कागदपत्र आणि स्टॅम्प देखील याच नावाचे केले जावेत अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरानंतर लवकरच अहमदनगर पोस्ट ऑफिसच नाव देखील अहिल्यानगर होणार आहे.

follow us