Download App

Prajakt Tanpure : आरोग्यमंत्र्यांना लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा, आमदार तनपुरे संतापले

Prajakt Tanpure : नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान या घटनेवरून राज्यात खळबळ माजली होती. या सुन्न करणाऱ्या घटनेने नांदेडसह संपूर्ण राज्य हादरले होते. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यात आज पुन्हा नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?

नांदेडच्या घटनेवरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना तनपुरे म्हणाले की, ‘नांदेड सारख्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने बळी जात असताना आरोग्य मंत्री करताय काय ?स्वतःची थोडीशी लाज वाटत असेल तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा.’ अशी टीका माजी मंत्री. तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, तब्बल ६० चिमुकल्यांचं आयुष्यचं बदलणार

यावेळी बोलताना तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, ‘महाविकास आघाडीने करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना आरोग्याच्या सेवा दिल्या. मात्र आत्ताच्या सरकार मधील काही मंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर निघाले नाही. अशी टीका करत आहे. मात्र राज्यात सध्या यंत्रणा कोडमली आहे. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना थोडीशी लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.’ अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

Boys 4 : गावची ओढ लावणारं ‘गाव सुटना’ गाणं प्रदर्शित!

नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरदेखील हे मृत्युसत्र थांबले नाही. दुसऱ्यादिवशीदेखील आणखी 6 रूग्णांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसात 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठी खळबळ माजली होती. मृतांमध्ये 12 बालकांचादेखील समावेश होता. यावेळी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची प्रचंड टंचाई आहे. हाफकीनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकीनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

https://youtu.be/PCA55ahwZh8?si=qfdaIyjis5dKCyjU

Tags

follow us