Download App

‘मनापासून अधिवेशन घ्या, उगाच नौटंकी नको…’, तनपुरेंची सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका

AHMEDNAGAR News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्याची प्रकृती खालावू लागल्याने सरकारने (government) तातडीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. मात्र आता सरकारच्या याच निर्णयावरून आमदार तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची बोलावलं तर किमान 3 दिवस तरी अधिवेशन घ्यावे. उगाच नौटंकी नको. या महत्वपूर्ण विषयावर सखोल व साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे, मात्र अधिवेशनबाबत अशी कोणतेही माहिती समोर आली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी खोचक टीका केली आहे.

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आपल्या गावी आमरण उपोषणाला बसले आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव देखील झाला. त्यांची ढासळणारी प्रकृती पाहता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या एकदिवसीय अधिवेशनावर आमदार तनपुरे यांनी ताशेरे ओढले आहे.

अधिवेशन! उगाच नौटंकी नको…: 20 तारखेला मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसीय अधिवेशन बोलावण्यात येतय. एका दिवसात किती आमदार आपलं मत व्यक्त करू शकणार आहेत ? पुढच्या रांगेत बसणारे 7-8 लोकं निम्मा दिवस घेणार. बाकीच्यांना अध्यक्ष 2 मिनिटात बेल मारणार. मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची इच्छा असेल तर किमान 3 दिवस तरी अधिवेशन घ्यावे. उगाच नौटंकी नको. या महत्वपूर्ण विषयावर सखोल व साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे असे स्पष्ट मत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले आहे.

वाकचौरेंना शिर्डीचं तिकीट फिक्स, नाराज घोलपांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

जरांगे मागण्यांवर ठाम: मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी देखील जरांगे यांनी केली होती. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार, अन्नपाणी काही घेणारच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

follow us