Maratha Reservation: डबल रोल करू नका; माझा जीव गेल्यावर सरकार राहील का ? जरांगेंचा गंभीर इशारा

  • Written By: Published:
Maratha Reservation: डबल रोल करू नका; माझा जीव गेल्यावर सरकार राहील का ? जरांगेंचा गंभीर इशारा

Manoj Jarange warning Eknath Shinde government : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी थेट मुंबईवर मोर्चा काढला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे हे मागे फिरले होते. आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून बरेच किचकट मुद्दे समोर आले. त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा आपल्या गावी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केलेय. चार दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तर आता तर मनोज जरांगे हे सरकारवर चिडले आहेत. त्यांनी आज थेट सरकारला इशाराही दिला आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार मराठ्यांची फसवणूक करतेय, डबल रोल करू नका, माझा जीव गेल्यावर सरकार राहील काय ? असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय.

कारखाने, झाकीर नाईक अन् तलाठी भरती घोटाळा; विखेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांनी सगळंच काढलं

मनोज जरांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधलाय. जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला अधिवेशन घेण्याचे सरकाराने सांगितले होते. आता म्हणतात 20 फेब्रुवारीला अधिवेशन घेऊ. सरकारचे हे काय चालू आहे हे कळत नाही. उपोषणात माझा जीव गेल्यानंतर सरकार राहिला का ? माझा जीव गेल्यावर महाराष्ट्राची दुसरी श्रीलंका होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. उद्या बुधवारी मराठा समाजाने महाराष्ट्र बंद हाक दिली आहे. उद्याचा बंद समाजाने शांततेत करावा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

Ravindra Dhangekar : अशोल चव्हाणांचा भाजप प्रवेश; आमदार धंगेकरांना ऑफर?


तर मोदींच्या सभा होऊ देणार नाही

सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या जरांगे यांनी आता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सभा मराठा समाज होऊ देणार नाही, असा इशाराही दिलाय. सरकारचे काय नुसते चाललले आहे. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व पवार यांचे काय नुसतेच चालले आहे. मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांनी खेटायचे आहे. आरक्षण न मिळाल्यास आम्ही पंतप्रधानांचा सभा होऊ देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय.

जरांगेंची प्रकृती खालावली

आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथ्या दिवस आहे. ते अन्न व पाणी घेत नाही. तसेच उपचारही घेत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. परंतु ते उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे सरकारकडून ही जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी जरांगेंना भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले होते. या शिष्टमंडळाने जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज