Download App

Prakash Ambedkar : नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय; आंबेडकरांचा टोला

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल दिला. त्यावरून टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा जरांगेंना थेट इशारा

यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, पक्ष कुणाचा आणि काय करायचं? हे 10 व्या शेड्युल प्रमाणे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. असा नवीन जावईशोध नार्वेकरांनी स्पीकर म्हणून काढला आहे. मात्र 10 शेड्युल प्रमाणे जे पक्षातून फुटतात ते इतर पक्षात प्रवेश घेत नाहीत तर त्यांना फक्त अपात्र करण्याचा अधिकार स्पीकरला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आर्थिक चोरी संदर्भात कारवाई करत आहेत. पण दुर्दैवाने जे अशी बौद्धिक माहिती चोरतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही. असा टोला आंबेडकरांनी नार्वेकरांसह मोदी यांना लागवला आहे.

गुहागरमध्ये भाजप-ठाकरे गट आक्रमक; राणेंच्या ताफ्यावर दगडफेक तर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा

तसेच यावेळी आंबेडकर हे जरांगे यांच्यावर देखील बोलले ते म्हणाले की, जारांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे, तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणते. 20 तारखेला होणारा मसुदा काय आहे? ते अजून सरकारने सांगितलं नाही. त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यात आहे की नाही? हे कळायला मार्ग नाही. येत्या वीस दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जालण्यातून जारांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी.

दरम्यान शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं.

follow us