Prakash Ambedkar : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील पोलिसांना माफ करा, त्यांच्यावर गु्न्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, असं धस म्हणाले. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केलं. सुरेश धस दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ खास विक्रम
धसांची डुप्लिकेट भूमिका
संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजकारण बाजूला ठेवून अन्यायाविरुद्ध लढणारे आमदार म्हणून धस यांची ओळख तयार झाली. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी चकीत भूमिका घेतली आहे. धस यांच्या भूमिकेबाबत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धस यांची डुप्लिकेट भूमिका समोर आली आहे. नॉन मराठ्यांवर अन्याय झाला तर सोडून द्या, देशमुखांना न्या द्या, ही जी धसांची भूमिका आहे, ती माझ्या अंदाजाने चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसवरणारी भूमिका आहे, असं मी मानतो.
अपहरणाची तक्रार का घेतली? बँकॉकला निघालेलं विमान परत कसं आणलं? आयुक्तांनी सांगितली Inside Story
पुढं बोलतांना आंबेडकर म्हणाले, मी या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. परभणीच्या घटनेमध्ये आम्ही फार काही हस्तक्षेप करून शकत नाही. याचं कारण ती कस्टडिअल डेथ आहे… पण, लातूरमधील घटना ऑनर किलिंगची घटना आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. तिथं असलेल्या राजकारण्यांनी द्वेष पसरवण्याचं काम थांबवावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ईव्हीएमबाबत आंबेडकर काय म्हणाले?
ईव्हीएमबाबत बोलतांना आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमबाबत दिलेले निर्देश योग्य आहेत. माझा एक विनंती आहे, सुप्रीम कोर्टाने ईव्हीए चेक करावं. ज्या ईव्हीएम मतदारसंघात होत्या, पण वापरल्या गेल्या नहीत, अशी ईव्हीएम कोर्टाने त्यांच्या आवारात बोलवव्यात आणि मतदान करायला सांगावं आणि ते मतदान योग्या येतं का ते बघावं. तरच ईव्हीएमची चीप मॅन्युप्युलेट होते की नाही, तेस समोर येईल, असं आंबेडकर म्हणाले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्याच्या प्रेमात आंकठ बुडालेले आमदार धस सांगतात तसं, चला आपण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू. धस साहेब, तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा. फिट्टमफाट होईल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांची चौकशी करा, सुरेध धस यांचे कॉल डिटेल्स तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले, याचाही तपास करा, अशी मागणी वंचित बुहजन आघाडीने केली.