आंदोलन, आरोप आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय, प्रकाश आंबेडकरांनी टाकला अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश

भाजपमधील नेतेच आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर प्रशचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Untitled Design 24

Untitled Design 24

Prakash Ambedkar shed light on many serious issues : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि निवडणूक विषयांवर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भाजपमधील नेतेच आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर प्रशचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्य पती प्रभाकरन यांनी आंध्र प्रदेश निवडणुकीत मतांमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले की, 2024 च्या आंध्र प्रदेश 5 टक्के मते कृत्रिमरीत्या वाढवली गेल्याच्या संशय आहे. या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या कथित प्रकाराचा फायदा चंद्राबाबू नायडू यांना झाल्याचे देखील त्यांनी सूचित केले.

महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये देखील असाच प्रकार घडल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, हा फ्रॉड महाराष्ट्रात देखील झाल्यासारखा दिसतो. त्यांनी उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांच्या निर्णयांवर प्रशचिन्ह उपस्थित करत, चेतन अहिरे यांचा उल्लेख करून या निर्णयामागे नेमकं कोण आहे याचा हवा, अशी मागणी केली.

निवडणूक प्रक्रियेवर बोलताना त्यांनी गंभीर त्रुटी दाखवून दिल्या. पोलिंग ऑफिसरला त्याच दिवशी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, मात्र तसं झालेलं दिसत नाही, असे ते यावेळी म्हणाले. देशात सध्या काहीही केलं तरी चालतं अशी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा देशाला मोठा फटका बसत असल्याची टीका देखील त्यांनी केली. मध्यमवर्गीय नागरिकांनी केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता देशाच्या सुरक्षिततेसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्य विरोधात अमेरिकेत झालेल्या आंदोलनाचा संदर्भ दिला. भारतात देखील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समर्थन देताना त्यांनी म्हटलं की, व्होट चोरीच्या आरोपांसाठी केवळ आंदोलन पुरेसं नाही, तर ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत, त्यांची यादी देखील सादर करायला हवी. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलन, आरोप आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय, प्रकाश आंबेडकरांनी टाकला अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश

आंबेडकर यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील बहुमतावर देखील प्रश्न उपस्थित करत, हे बहुमत संशयास्पद आहे, असा आरोप केला. निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यायला हवे होते, असे देखील ते म्हणाले. मतदार याद्यांबाबत धक्कादायक दावा करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 90 लाख मतदारांची नावे कमी होण्याची शकयता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच सुमारे 2  लाख 50 हजार मतदार आणि इत्तर ठिकाणी 30 हजार मतदार कमी होऊ शकतात.

निवणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवर टीका करत त्यांनी त्याला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हटले आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला देखील ओढले जात असल्याचा आरोप केला. राजकीय स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या काँग्रेस आणि काही प्रमाणात आम्हीच खरा विरोधी पक्ष उरलो आहोत. तसेच ओबीसींसाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

इतिहासाच्या संदर्भात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्य कार्याचा उल्लेख करत, शिवाजी महाराजांना समाजासमोर आणण्याचे मोठे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले, असे सांगितले. दरम्यान, नक्षलवाद्यांसंदर्भातील कायद्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, मात्र अशोक खरात प्रकरणावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

Exit mobile version