Prakash Ambedkar Speak on Chatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि क्रूरपणे हत्येसाठी हिंदूच कारणीभूत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसाठी कोण जबाबदार?. औरंगजेबाला संभाजी महाराजांची कोणी माहिती दिली? कोणाच्या सांगण्यावरुन संभाजी राजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रकाश आंबेडकरांनी दिली आहेत.
आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवरायांनी गणूजी शिर्के यांचे वडिल टिलाजीरावांची जमीन काढून घेतली होती. शिवरायांच्या निधनानंतर गणूजी शिर्के यांनी त्यांची जमीन परत केली नाही म्हणूनच संभाजी महाराज संगमेश्वरला आल्याची माहिती गणूजी शिर्के यांनी औरंगेजबाला दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील सर्व माहिती जेमिनी कडू यांच्या पुस्तकात स्पष्टपणे म्हटल्याचं त्यांनी सांगितलंय.
Prithviraj Sukumaran: साऊथचा प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान गंभीर अपघात
गणूजी शिर्केंच्या माहितीनंतर संभाजीराजांनी कैद करण्यात आलं होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या सल्लागार समीतीमध्ये आबा भटजी यांचा समावेश होता. आबा भटजी यांनी संभाजी महाराजांना कशी शिक्षा द्यावी हे सांगितलं होतं. त्यावेळी मनस्मृतीत सांगितल्याप्रमाणेच संभाजी महाराजांना क्रूरपणे शिक्षा देण्याबाबतचं आबाजी भटजींनी सांगितलं होतं. त्यामुळे संभाजी महाराजांच्या हत्येला हिंदूच जबाबदार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा एक फोन अन् वारकऱ्याचे वाचले ‘प्राण’
संभाजी राजांप्रमाणे भारतात असलेल्या राज्यकर्त्यांच्या अनेक हत्या औरंगजेबाने केल्या आहेत. औरंगजेबाने स्वत:च्या भावाची, निजामशाही, अदिलाशाहीच्या राज्यकर्त्यांचीही हत्या केली पण फक्त संभाजी राजांचीच हत्याने क्रूरपणे करण्यात आली आहे. संभाजी राजांची हत्या ही सुफी आणि मुस्लिम धर्माशी सहमत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, संभाजी महाराजांची यासंर्भातील माहिती जेमिनी कडू यांच्या पुस्तकात लिहिलेली असून आताच्या इतिहासकारांनी संदर्भ घेऊन संशोधन करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. एकंदरीत औरंगजेबावरुन सुरु असलेल्या वादंगानंतर आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती, त्यावेळी आंबेडकरांवर टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. आता या दाव्यानंतर आंबेडकर पुन्हा विरोधकांच्या रडारवर येतील? अशी शक्यता आहे. त्यामुळे आता या दाव्यानंतर विरोधकांकडून नेमकी कोणती भूमिका घेण्यात येईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.