Prashant Koratkar Granted Interim Bail : एक मोठी बातमी समोर येत आहे. (Koratkar) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अचानक फोन करुन प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसंच चुकीचा इतिहास का सांगता असं विचारताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप खुद्द इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली. तसंच कोरटकरवर कारवाईची मागणी केली. यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.
नागपुरमध्ये आंदोलक आक्रमक, प्रशांत कोरटकरचा आका कोण? थेट पोलिसांना विचारला सवाल
दरम्यान, शनिवारी इंद्रजीत सावंत यांची पोलिसांनी या प्रकरणी सात तास चौकशी केली. तसंच, त्यांच्या फोनवर आलेल्या या कॉलची फॉरेन्सिक तपासणी केली. तसंच सीडीआर देखील तपासले यामध्ये हा फोन कॉल खरा असल्याचं उघड झालं, त्यामुळं या ऑडिओ क्लीपमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नसून तो कोरटकरचाच आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑडिओ क्लीप फेकचा दावा
कोरटकरच्या आक्षेपार्ह विधानामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये या प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण पेटल्याचं लक्षात येताच कोरटकरनं घुमजाव करत आपला हा आवाज नसल्याचा दावा केला. तसंच ही फेक ऑडिओ क्लीप असल्याचंही त्यानं म्हटल. पण अखेर त्याचा हा दावा फोल ठरला आहे.