Video : पुण्यात बिल्डरची नागरिकांना मारहाण; जागा बळकावण्याचा प्रयत्न?
Pune News : पुण्यात (pune crime) मागील काही दिवसांपासून गुन्ह्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गॅंगवॉर असो वा हत्या करण्याच्या घटना पुण्यासारख्या सांस्कृतिक म्हणवल्या जाणाऱ्या शहरात घडताहेत. अशातच आता पुण्यातील बाणेरमध्ये आयटी पार्कजवळील एका सोसायटीमधील नागरिकांवर बिल्डरचा दहशत करतानाचा व्हिडिओ समोर आलायं. या व्हिडिओमध्ये बिल्डर बेसबॉलच्या दांड्याने नागरिकांना मारहाण करताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांचा वचक राहिला की नाही? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर…
-एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो.
धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी… pic.twitter.com/4eJCcb8Llb— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) October 2, 2024
स्मार्ट सिटी आयटी पार्कजवळील एका सोसायटीमध्ये नागरिक अनेक वर्षांपासून राहतात. मात्र, जागा बळकावण्याच्या उद्देशाने या बिल्डरकडून सोसायटीमधील नागरिकांना मारहण करण्यात आलीयं. चारचाकीमध्ये येत या बिल्डरने आणि त्याच्या मुलाने सोसायटीमधील नागरिकांना शिवीगाळ करुन मारहाण केलीयं. एवढंच नाही तर धमक्याही दिल्या आहेत. आरोपांनूसार सदरील व्यक्तीवर जेसीबी घालण्याचाही प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भातील माहिती सौरभ कोराटकर नामक व्यक्तीने आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केलीयं. सोबतच व्हिडिओदेखील शेअर केलायं.
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळाला नवा चंद्र.. जाणून घ्या, कसा पाहता येईल पिटूकला चांदोबा..
या पोस्टमध्ये सौरभ कोराटकर म्हणाले, पुण्यातील ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आपल्या मेहनतीने घेतलेल्या पैशाने निमुटपणे सहन करत आहे. सामान्य नागरिकांना स्टिक, बेसबॉलचे दांडे, बायकांसमोर अभद्र भाषेत शिवीगाळ करुन भयंकर पद्धतीने मारहणा केली जात आहे. यावेळी बीट मार्शलने वाचवलं नसत तर या बिल्डरने आणखीन मारहाण केली असते, असं या पोस्टमध्ये लिहिलंय.
या व्हिडिओमध्ये नागरिकांना मारहाण करण्यासाठी बॅट, बेसबॉलचे दांडे आणले असल्याचंही दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ एका नागरिकाने शूट केला असून यामध्ये सदरील बिल्डरच्या गाडीमध्ये दांडे, बॅट आढळून आल्या आहेत. यशवंत निम्हण असं या बिल्डरचे नाव असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला की नाही? याबाबत माहिती मिळू शकली नाही, मात्र पुण्यासारख्या शहरात बिल्डरांकडून नागरिकांना अशाच प्रकारचा त्रास होत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.