दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळाला नवा चंद्र.. जाणून घ्या, कसा पाहता येईल पिटूकला चांदोबा..
Earth Second Moon : 2024 PTS.. हे नाव आपल्या नव्या चंद्राचं (Earth Second Moon) आहे. आता हा पिटूकला चंद्र पुढील दोन महिने आपल्या पृथ्वीभोवती फिरणार आहे. हा एक मिनी मून (Mini Moon) आहे. खरंतर हा एक एस्टरॉईड आहे. तो अंतरिक्षात त्याच्या दूरवरच्या प्रवासावर आहे. पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण (Earth Gravity) शक्तीच्या प्रभावामुळे एक चक्कर येथे मारून पुढे निघणार आहे.
या एस्टरॉइडच्या बेल्टच नाव आहे अर्जुन एस्टरॉइड बेल्ट. हा बेल्ट पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान स्थित आहे. येथून निघाल्यानंतर तो सरळ आपल्या घरी जाणार आहे. हा बेल्ट सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर दूर आहे. पृथ्वी आणि सूर्यातील अंतरही जवळपास इतकेच आहे. मॅड्रीड विद्यापीठाचे प्राध्यापक कार्लोस डेला फ्यूएंटे मार्को यांनी सांगितले की अर्जुन एस्टरॉइड बेल्टची दिशा वेगळी आहे. या बेल्टमध्ये असलेले दगड साधारणपणे नियर अर्थ ऑब्जेक्ट आहेत. यातील काही दगड पृथ्वीच्या अगदी जवळ येतात. जवळपास ४५ लाख किलोमीटर अंतरावर येतात. या दगडांचा वेग ३५४० किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो.
उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही
तुम्ही साधारण टेलीस्कोप किंवा दुर्बिणीने यांना पाहू शकत नाहीत. ३० उंच डायमीटर वाला सीसीडी किंवा सीएमओएस डिटेक्टर टेलीस्कोप असेल तर तुम्हाला हा मिनी मुन पाहता येईल. या मिनी मुनबाबत द रिसर्च नोट्स ऑफ द एएएस जर्नल मध्ये नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अशा पद्धतीने पृथ्वीजवळ मिनी मून येतात
मिनी मूनच्या घटना दोन पद्धतीने होतात. यामध्ये पहिली पद्धत म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरत्वाकर्षणात अशा पद्धतीने अडकावी की किमान दोन वर्षे निघू नये. पृथ्वीच्या चारही बाजूंनी प्रदक्षिणा घालत राहावी. दुसरी पद्धत म्हणजे कमी कालावधीसाठी एखादा दगड पृथ्वीच्या जवळ यावा आणि त्याने पृथ्वीची एक किंवा अर्धी चक्कर मारावी.
मिनी मून याआधीही पृथ्वीला चक्कर मारून गेले
आतापर्यंत दोन वेळा असे घडले होते. दोन दगड दीर्घ काळासाठी पृथ्वीचे मिनी मून बनले होते. सन २००६ मध्ये RH 120 आणि २०२० मध्ये CD3. या शिवाय तीन लहान दगड लहान कालावधीसाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात फसले होते. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील वैज्ञानिक या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा मिनी मून कोणत्या वाटेने येतोय आणि त्याचा बाकीचा व्यवहार कसा आहे याचा अभ्यास करण्याच्या कामात वैज्ञानिक गुंतले आहेत.
काय सांगता! ‘लॉकडाऊन’ने चांदोमामाही गारठला होता.. भारतीय वैज्ञानिकांच्या अभ्यासात मोठा खुलासा