अभिमानास्पद! चंद्रयान 2 ने उलगडलं चंद्राचं मोठं रहस्य, अद्भूत शोध; इस्त्रोही आनंदी…

Chandrayaan 2 New Research : इस्त्रोने शुक्रवारी विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेल्या महत्वाच्या अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासात भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरच्या रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण (Chandrayaan 2) करण्यात आले. वैज्ञानिकांचे याआधीचे अंदाज खोडून काढत चंद्र जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या मागील भागातून प्रवास करतो तेव्हा प्लाझ्मा घनचा कमी होत नाही. याउलट इलेक्ट्रॉन घनता जास्त प्रमाणात आढळते.
🚀 New Discovery from Chandrayaan-2! 🌕
A recent study reveals a surprisingly high electron density of ~23,000 electrons/cm³ in the lunar environment when the Moon enters Earth’s geomagnetic tail. 🌍⚡
📄 Published in: The Astrophysical Journal – Letters
🔗 More details:…— ISRO (@isro) March 7, 2025
चंद्रावर प्लाझ्मा कोणत्या पद्धतीत
चंद्रावरील वातावरणात प्लाझ्मा कशा पद्धतीने व्यवहार करतो याची माहिती या अभ्यासात देण्यात आली आहे. रिसर्चर्सने सांगितले की चंद्राच्या पृ्ष्ठभागावर असलेली चुंबकीय क्षेत्रे प्लाझ्माला अडकून ठेवतात. यामुळे त्याचे डिफ्यूजन थांबते आण स्थानिक पातळीवर इलेक्ट्रॉन घनतेत वाढ होते. हा शोध द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. चंद्रयान 2 ऑर्बिटर चांगल्या स्थितीत आहे आणि गरजेनुसार डेटा देखील उपलब्ध करुन देत असल्याचे रिसर्चर्सने सांगितले.
नेमका कसा झाला अभ्यास
निष्कर्षांची माहिती घेण्यासाठी वैज्ञानिकांनी चंद्राच्या चारही बाजूंनी प्लाझ्मा डिस्ट्रीब्यूशन स्टडीसाठी नव्या पद्धतीचा उपयोग केला. यामध्ये दोन बाजूला रेडिओ ऑकल्टेशन प्रयोगात एस बँड टेलिमेट्री आणि टेलीकमांड (टीटीसी) रेडिओ सिग्नल्सचा वापर करण्यात आला. चंद्राच्या प्लाझ्माच्या थराच्या माध्यमातून चंद्रयान 2 च्या रेडिओ प्रसारणाला ट्रॅक करण्यात आले. हे संकेत भारतीय डीप स्पेस नेटवर्क (आयडीएसएन) बंगळुरू येथे प्राप्त करण्यात आले.
या निष्कर्षांवरून लक्षात येते की चंद्राच्या वातावरणात इलेक्ट्रॉन्सची घनता अनपेक्षितपणे खूप जास्त आहे. ही घनता जवळपास 23 हजार इलेक्ट्रॉन प्रति घन सेंटीमीटर आहे. चंद्राच्या सूर्यप्रकाशाकडील भागाच्या तुलनेत ही घनता जवळपास शंभर पट जास्त आहे.
काय होणार फायदा
चंद्राच्या भोवती असणाऱ्या जटील प्लाझ्मा वातावरणाचा उलगडा करण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा टप्पा आहे. विविध अवकाश वातावरणात चंद्राचे आयनोस्फीअर कसे वागते हे समजून घेतल्याने चंद्राच्या अधिवासांचे नियोजन सुधारेल. विशेषतः पृथ्वीच्या क्रस्टल चुंबकीय क्षेत्रांनी प्रभावित असलेल्या प्रदेशांत.
Moon Misson Isro : भारताची पुन्हा चंद्र मोहिम; जपानलाही सोबत घेऊन जाणार..