Download App

काँग्रेस देशातील भ्रष्ट अन् बेईमान पार्टी; ठाण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा थेट घणाघात

या योजनेमुळे महाविकास आघाडी सरकारला त्रास होत आहे. ते सत्तेत आले की ते ही योजना बंद करतील असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi Sabha In Thane :  काँग्रेस देशातील भ्रष्ट आणि बेईमान पार्टी आहे. (PM Narendra Modi) त्यांचं सरकार आलं की ते भ्रष्टाचार करतात. त्यामुळे त्यांना कोसो दूर ठेवा त्यांना सत्ता देऊ नका. त्यांनी टॉयलेटवरही टॅक्स लावला आहे. त्यामुळे हे सरकारमध्ये नसले पाहिजेत असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका, त्यांना महाराष्ट्र संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्रात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महाविकास आघाडी सरकारला त्रास होत आहे. ते सत्तेत आले की ते ही योजना बंद करतील असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. काँग्रेस अर्बन नक्षलवाद चालवतो असा घणाघातही मोदी यांनी यावेळी केला आहे. आज काँग्रेस सरकार बनवण्याच्या विचारात आहे. परंतु, आपण सावध राहिलं पाहीजे असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

follow us