Download App

मोठी बातमी! ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी

नीट पेपर लिक प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये लातुरातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Neet Exam Scam : देशात नीट पेपर लिक प्रकरणारे मोठा गदारोळ निर्माण केला आहे. (Neet Exam) विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. दरम्या, या प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत सहभागी असल्याच्या संशयावरून येथे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latur Pattern) केंद्र सरकारने संमत केलेल्या सार्वजनिक परीक्षा (गैरव्यवहार प्रतिबंधक) कायदा २०२४ अंतर्गत राज्यातील हा पहिला गुन्हा आहे.

आठ दिवसांची पोलीस कोठडी

यातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या जलिल उमरखाँ पठाण (वय ३४, रा. अलहायात अपार्टमेंट, लातूर) याला अटक करण्यात आलं असून पोलिसांनी त्याला काल सोमवार (ता. २४) न्यायालयात हजर केलं होत. दरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. चव्हाण यांनी पठाण याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मध्यरात्री गुन्हा दाखल Neet Exam Scam: तुरुंगातून नीट पेपरफुटीचा प्लॅन राबवला; कोण आहे हा मास्टरमाईंड रवी अत्री?

‘नीट’ परीक्षेत गैरकृत्य केल्याप्रकरणी संजय तुकाराम जाधव (वय ४०, रा. जिजाऊ कॉलनी, रेणापूर रस्ता, लातूर), जलिल उमरखाँ पठाण (वय ३४, रा. टाके नगर, लातूर), इरन्ना मष्णाजी कोनगलवार (रा. उमरगा, जि. धाराशिव), गंगाधर (रा. दिल्ली) यांच्याविरोधात येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी (ता. २३) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पठाण आणि जाधव यांना नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने शनिवारी (ता. २२) रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं.

पेपरफुटीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत

प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. चौकशीसाठी आम्ही पुन्हा बोलवू. लातूर सोडून जाऊ नका, अशा सूचना पोलिसांनी दोघांनाही दिल्या होत्या. मात्र, जाधव फरार झाला. तर पठाण याला पोलिसांनी आज पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामुळे लातूरातील ‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोचले असल्याचं निष्पन्न झालं आहे.

जाधवचा शोध सुरू पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

पोलिसांनी तशा सुचना दिलेल्या असतानाही जाधव हा लातूर सोडून पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसंच, उमरगा आणि दिल्ली येथील संशयित आरोपींचाही शोध घेतला जात आहे. पठाण हे लातूर तालुक्यातील कातपूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तर जाधव हे टाकळी (ता. माढा. जि. सोलापूर) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पठाण आणि जाधव हे मित्र असून चारही आरोपी जानेवारीपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीत ते सहभागी असून त्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार घडून आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

काय आहे नवा कायदा?

परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक परीक्षा (गैरव्यवहार प्रतिबंधक) कायदा २०२४ लागू करण्यात आला आहे. यानुसार आरोपीला तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. परीक्षेमध्ये हेराफेरी करणे, त्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होणे, गैरकृत्यात सहभाग असणे अशांविरोधात हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. फेब्रुवारीमध्ये संमत झालेल्या कायद्याची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

विद्यार्थी, पालकांकडून वसुली

लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी ‘नीट’ परीक्षेत गुण वाढवून देण्याचं आमिष दाखवून विद्यार्थी, पालकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींचा देशाच्या विविध भागांत घडणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणात सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी आणि लातुरातील आरोपींच्या संपर्कात असलेला दिल्लीतील आरोपी गंगाधर याला ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलिसांचं पथक लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज