Prithvirja chavan On Gautam Adani meet Sharad Pawar : देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून समोर आली नाही. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कुणी-कुणाला भेटावे यावर मी काय बोलणार. त्या एकमेकांचे जुने संबंध आहेत. त्यांचे सहकार्य घेण्याकरिता ते भेटले असतील. यावर मी काही बोलू शकणार नाही. अदानींबद्दलचे आमचे प्रश्न कायम आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे अदानी व पंतप्रधानांनी दिली पाहिजेत. राहुल गांधींच्या प्रश्नांवर अदानींना उत्तर द्यावीच लागतील. तसेच पंतप्रधानांना याची उत्तरे द्यावीच लागतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
याआधी गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनंतर देशभरात मोठी खळबळ माजली होती. याचा अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्षाकडून देखील अदानी यांच्यावर प्रश्न विचारात सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे…आमचं सरकार आलं की परतफेड होणारच
दरम्यान, शरद पवार यांनी मात्र गौतम अदानी यांचं समर्थन केलं. याशिवाय त्यांनी विरोधकांनी मागितलेल्या संयुक्त संसद समितीला देखील विरोध केला. त्यामुळे शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या मैत्रीवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते.