Download App

अजित पवारांचं ठरलं! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार, आजच अर्ज दाखल करणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांंना राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

Sunetra Pawar Application for Rajya Sabha Candidacy : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांंना राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आज दुपारी दीड वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, पार्थ पवार आणि आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. यानंतर सुनेत्रा पवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळाली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. काल पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरेंनी गुरुवारी सकाळी राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची नावं जाहीर करू असे सांगितले होते.

“लोकसभेला साथ दिली, पुढे तीन महिन्यांनीही द्या”, शरद पवारांची विधानसभेसाठी फिल्डिंग

मात्र, त्याआधीच माहिती मिळाली होती की सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. हा अंदाज अखेर खरा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर आधीच घराणेशाहीचा आरोप केला जात होता. त्यामुळे राज्यसभेसाठी पवार घराण्या व्यतिरिक्त अन्य उमेदवार असणार का, अशीही चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीने पुन्हा सुनेत्रा पवारांनाच संधी दिली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे आता अजित पवार यांचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, बारामती मतदारसंघातील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. यानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी पुणे आणि काटेवाडीतील समर्थकांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला संधी देणार याची उत्सुकता होती. या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, बाबा सिद्दीकी यांचीही नावं चर्चेत होती. मात्र या नावांना बाजूला सारत पक्षाने सुनेत्रा पवारांना पुन्हा उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज दुपारी दीड वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

“बारामतीत अपक्ष लढलो असतो तर एक हजार टक्के जिंकलो असतो” शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा

 

follow us

वेब स्टोरीज