Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज पुण्यातील एका न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात कायमची हजेरीपासून सूट देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात गेल्या महिन्यात व्हर्च्युअल पद्धतीने न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
विनायक दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात पुण्यातील एका विशेष न्यायालयाने मंगळवारी त्यांना हजेरीपासून कायमची सूट दिली आहे. राहुल गांधी यांना उच्चस्तरीय सुरक्षा आहे आणि ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. असं न्यायालयाने म्हटले आहे. मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी गेल्या महिन्यात न्यायालयात अर्ज दाखल करून राहुल गांधी यांना हजर राहण्यापासून कायमची सूट मिळावी अशी मागणी केली होती.
न्यायालयाने काय म्हटले?
खासदार/आमदार न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अमोल शिंदे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, आरोपी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहे आणि त्यांना अनेक बैठकांना उपस्थित राहावे लागते. तसेच त्यांना ‘झेड-प्लस’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर होणारा खर्च आणि सुनावणीला उपस्थित राहताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या लक्षात घेऊन, त्यांना या प्रकरणात हजर राहण्यापासून कायमची सूट देण्यात येत आहे. असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
प्रकरण काय?
हे प्रकरण 2023 मध्ये राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या भाषणाशी संबंधित आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात स्वातंत्र्यसैनिकांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा हवाला देऊन सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यानंतर सावरकरांच्या सावरकरांच्या नातवाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात जामीन मिळाला आहे.
अगोदर गोट्या खेळत होता का? अभिजीत पवार यांचा पक्षप्रवेश अन् जितेंद्र आव्हाडांना अजितदादांचा टोला