राहुल गांधींच्या मर्जीतल्या सपकाळांपुढे दिग्गजांची मर्जी सांभाळण्याचं आव्हान

राहुल गांधींच्या मर्जीतल्या सपकाळांपुढे दिग्गजांची मर्जी सांभाळण्याचं आव्हान

प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई

Challenges for New Congress President Harshvardhan Sapakal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पक्षातील वरिष्ठ व दिग्गज नेते असल्याने पक्षातील संभाव्य गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या मर्जीतील हर्षवर्धन सपकाळ यांना या पदाची संधी देऊन पक्षातील असंतुष्ट नेत्यांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

खुशी कामाख्या देवीची निस्सीम भक्त! ‘जादू तेरी नज़र’ साठी घेणार देवीचं दर्शन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तरुण पिढीतील सतेज पाटील, विश्वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आधी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली. यशोमती ठाकूर यांना प्रदेशाध्यक्ष म्हणूनही माध्यमांनी समोर आणले. मात्र प्रत्यक्षात या सर्वांचे नाव डावलून हर्षवर्धन सपकाळ या नावावर काँग्रेस श्रेष्ठींनी मोहोर उमटवली.

डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..

हर्षवर्धन सकपाळ हे बुलढाणा जिल्ह्यातून 2014 ते 2019 या कालावधीत काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले होते. आक्रमक विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या कामातून आपली नवीन ओळख निर्माण केली त्यात त्यांना राहुल गांधी यांच्या कोअर कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसेच सपकाळ यांनी केलेल्या कामामुळे काँग्रेस पक्षाच्या पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी; सभापती प्रा. राम शिंदे

त्यामुळे गांधी परिवाराच्या अधिक जवळ जाण्यात सपकाळ यशस्वी झाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सपकाळ यांची पार्श्वभूमी अत्यंत सर्वसाधारण घरातील असल्याने व त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचार चे आरोप किंवा परंपरागत काँग्रेस नेत्यांप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक शैक्षणिक संस्था किंवा साखर कारखाने किंवा सूत गिरणी असे कुठलेही वलय त्यांच्यामागे नाही. त्यामुळे एक प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं वादग्रस्त ट्विट; विकीपीडियावरील मजकूर हटवण्याचे फडणवीसांचे आदेश

सपकाळ यांच्या या स्वच्छ प्रतिमेचा वापर पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी होऊ शकेल असे श्रेष्ठींना वाटले असल्यास शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सपकाळ मुंबईत खाजगी वाहनाने आले व मुंबईतील ग्रँड रोड येथील सर्वोदय मंडळाच्या कार्यालयाचे जमिनीवर झोपले त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली मात्र सपकाळ यांनी याबाबत बोलताना आपले राहणीमान असेच असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणाऱ्या ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

त्यांच्या याच ओळखीमुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष मिळालं असल्याची चर्चा आहे. मात्र या निवडूमुळे एकीकडे काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल मिळू शकेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे जे वरिष्ठ व दिग्गज नेते आहेत त्यांचा इगो दुखावल्याची लेकिन चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री माजी विरोधी पक्ष नेते माजी प्रदेशाध्यक्ष अशा अनेक नेत्यांची काँग्रेसमध्ये भरणार आहे.

PM मोदी अन् मस्कच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील ग्रँड एन्ट्रीचा प्लॅन ठरला; Linkedin वर निघाली बंपर भरती

या सर्व नेत्यांना आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करावे लागणार आहे. त्यामुळे एक माजी आमदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या सपकाळ यांच्या हाताखाली काम करण्यात या नेत्यांची नेमकी भूमिका कशी राहील? त्यावर पक्षाचे पुढचे भवितव्य अवलंबून आहे. सपकाळ यांच्या पदग्रहण समारंभात मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सर्व सपकाळ यांच्या पाठीशी ठामपणे व खंबीरपणे उभे राहू व पूर्ण ताकतीने काँग्रेस पक्षाला ताकद देऊ असा निर्धार व्यक्त केला.

हुंडा, शिक्षण नव्हे तर, खराब CIBIL ने मोडलं लग्न; अकोल्यातील मोडलेल्या लग्नाची तुफान चर्चा!

तरी प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये अनेक गट तर नेहमीच कार्यरत राहतात या गटातटाच्या माध्यमातून मधून मार्ग काढून काँग्रेस पक्षाला पूर्वीप्रमाणे विजयी मार्गावर नेण्यात सपकाळ यशस्वी होतात. काही पाहणे महत्त्वाचे ठरेल केवळ राहुल गांधींची मर्जी आहे किंवा सर्वसामान्य प्रतिमा चांगली प्रतिमा आहे. या बळावर काँग्रेसमध्ये यशस्वी होणे कितपत शक्य आहे. याचा अनुभव आता सपकाळ यांना काही कालावधीतच येईल. अशी चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube