खुशी कामाख्या देवीची निस्सीम भक्त! ‘जादू तेरी नज़र’ साठी घेणार देवीचं दर्शन

Star Plus serial Jaadu Teri Nazar Daayan Ka Mausam : स्टार प्लसवर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन रोमांचक शो घेऊन आलंय. जादू तेरी नजर – डायन का मौसम असं या शोचं नाव असून या शोची झलक दाखवण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एका रहस्यमयी दुनियेला प्रेक्षक जवळून पाहणार असून हा शो भीती, रोमांचपूर्ण असणार आहे.
डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..
खुशी दुबे, ही या स्टार प्लसचा शो “जादू तेरी नजर—डायन का मौसम” मध्ये गौरीची शक्तिशाली भूमिका निभावणार आहे. खऱ्या आयुष्यातही ती देवी कामाख्याची निस्सीम भक्त आहे. तिला वाटत की, तिच्या या मिस्टिकल शोसाठी कामाख्या देवीचा आशीर्वाद तीला मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे तिने शोच्या आगोदर कामाख्या देवीला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी; सभापती प्रा. राम शिंदे
शोच्या लीडमध्ये अभिनेता जैन इबाद खान, खुशी दुबे, जो विहान, गौरी झळकणार आहेत. या विशेष कार्यक्रमात इतरही प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या सहभाग घेणार असून समृद्धी शुक्ला, रोहित पुरोहित, सचिन, नेहा हरसोरा या कार्यक्रमात झळकणार आहेत. जादू तेरी नजर डायन का मौसम शोमध्ये प्रेक्षकांचा असं काही पाहायला मिळणार आहे की, एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं वादग्रस्त ट्विट; विकीपीडियावरील मजकूर हटवण्याचे फडणवीसांचे आदेश
एका आश्चर्यकारक स्थळापासून या शोची सुरुवात होणार असून रहस्यमयी प्रवास असणार आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना एक खास टास्क देण्यात येणार असून जंगलामध्ये डायनपासून वाचण्यासाठी रहस्यमयी दरवाजांच्या मागे, धनसंपत्ती शोधत आपल्या जोडीदाराला सोडवतानाचे सीन्स यामध्ये अनुभवायला मिळणार आहेत.पत्रकार परिषदेतून अभीरा, अरमान आणि सचिन, सायली यांनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत.
समृद्धीने सांगितलं की या प्रवासात आम्हाला भरपूर मजा आली असून आव्हानेही खूप होती. जंगलातील एका विहीरीतून डायनला हरवण्याचा सर्वांत कठीण टास्क होता. पूर्ण खेळाच्या प्रत्येक स्टेपमध्ये बुद्धी आणि हिमतीच्या जोरावर अग्निपरिक्षा झाली असल्याचं तिने म्हटलंय. रोहितने एका खेळाची प्रशंसा करीत म्हणाला की, प्रत्येक स्टेपवर काही नवीन आणि आश्चर्यकारक होतं, यामध्ये एक अनोखा अनुभव असल्याचं रोहितने यावेळी सांगितलंय.
सचिन आणि सायलीने आपले अनुभव शेअर करताना सांगितलं की, यामध्ये प्रत्येक स्टेप भीतीदायक होती, आश्चर्यकारक करणाऱ्या गोष्टींचा आम्हाला सामना करावा लागला, मोठी आव्हानेही होती असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, जादू तेरी नजर डायन का मौसमचे 200 एपिसोडचा प्रवास येत्या 18 फेब्रुवारीला रात्री 8 :15 वाजता सोमवार ते रविवारी स्टार प्लस चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. एक सस्पेन्स आणि जादूने भरलेली ही गोष्ट सर्वांनी जरुर पाहावी, असं आवाहनही करण्यात आलंय.