डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..

डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..

Devendra Fadnavis : राज्य सरकारचा मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्ष आहे. तरीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र वैद्यकिय सहायता निधी कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे या घोषणेचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात एक कक्ष आधीच असताना दुसऱ्या कक्षाची काय गरज, या घोषणेला शिंदे-फडणवीस यांच्यातील सुप्त वादाची काही किनार आहे का असे प्रश्न विचारले जात आहे. याच आशयाचा एक गुगली प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला. मात्र फडणवीस यांनी दिलेल्या सेफ उत्तराची आता चर्चा होत आहे.

मुख्यमंत्र वैद्यकिय सहायता निधी कक्ष असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. समांतर अशा काही गोष्टी घडत आहेत का असे विचारले असता फडणवीस म्हणाले, यात काहीचं चुकीचं नाही. मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकिय कक्ष चालवायचो. याद्वारे समन्वयाचा भाव असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे काही प्रकरणे येत असतात. त्यामुळे उपमु्ख्यमंत्र्यांनी वैद्यकिय कक्ष सुरू केला असेल तर त्यात काहीच गैर नाही.

डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले

खरंतर राज्यातील गरीब रुग्णांना खर्चिक उपचार घेणे शक्य होत नाही. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला होता. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी कक्ष आहे. मात्र असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आता त्यांनी घोषणा केली म्हटल्यानंतर वैद्यकिय कक्ष अस्तित्वात येईलही. याच पद्धतीने दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अशीच घोषणा करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्यातील 51 हजार 419 रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात आली होती. या कक्षाचे मुख्य कार्यालय मुंबईत असले तरी एक कार्यालय उपराजधानीतही आहे. या कक्षाच्या माध्यमातून विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते. नागपूर येथील या कक्षाच्या माध्यमातून मागील वर्षभरात 1 हजार 503 रुग्णांना उपचारासाठी 12 कोटी 85 लाख 46 हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात आली होती.

Video : मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर पदर पसरणार; देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube