Video : मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर पदर पसरणार; देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक

Supriya Sule at Massajog : आई आई असते. माझ्या मावशीचा मुलगाही असाच गेला. त्याला आता २५ वर्ष झाली. तरी तिच्या डोळ्याच पाणी हटत नाही. मी सुद्धा कुणाचीतरी एक मुलगी आहे. कुणाचीतरी बहीण आहे. (Supriya Sule ) कुणाचीतरी पत्नी आहे. त्यामुळे संतोषच्या आईचं, मुलीचं, पत्नीचं, भावाचं दु:ख समजू शकते. त्यामुळे आजपासून देशमुख कुटंब एकट लढणार नाही. त्यांच्यासोबत मी आहे असं ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख कुटुंबाला दिला. त्या संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मस्साजोग येथे माध्यमांशी बोलत होत्या.
मी आणि बजरंग बाप्पा आम्ही काही दिवसांपूर्वीच अमित शाहांना भेटलो, हात जोडून त्यांना विनंती केली की या प्रकरणात कुणाचीही गय करू नका अशी विनंत केली अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. मी संतोष देशमुख यांच्या मुलीला, आईला शब्द देते की, बीडमधील ही सत्तेची आणि पैशांची मस्ती मी मोडून काढणार. आपण सगळे एकत्र लढू, ताकदीने लढू,तुमच्या केसेस मी बघते, ही गुंडागर्दी थांबली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Video : आम्हाला घाबरवतात पण न घाबरता लढणार; सुप्रिया सुळेंसमोर धनंजय देशमुखने सांगितला घटनाक्रम
प्रशासन नेमकं काय करतंय? काय तपास करतंय? यात लपवण्यासारखं काही नाही, त्यामुळे या प्रकरणातली माहिती द्यावी असं मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकार रोज आमचे फोन टॅप करतंय, मग कृष्णा आंधळेचा कसा टॅप करू शकत नाही. तो कसा सापडत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.