Supriya Sule : ‘माझ्यावरील प्रेम कमी झालं असेल’, सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं

Supriya Sule : ‘माझ्यावरील प्रेम कमी झालं असेल’, सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं

Supriya Sule On Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहेत. बारामतीमध्ये आता पवार कुटुंबातच आरोप- प्रत्यारोपाचा पाढा जोरदार सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता कदाचित माझ्यावरील प्रेम कमी झालं असेल, अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बहिणीचं प्रेम कुठे तरी कमी पडलं असेल. दुर्देवाने सर्वच नात्यात अडकले आहेत. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश मग राज्य मग पक्ष मग नाती… मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे… दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं… घटस्फोट होऊन सात महिने झाले… अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं… दादा पालकमंत्री होते मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते. असा थेट टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

अजितदादा ‘कचाकचा’ तून सुटले; क्लिनचिट देत EC ने दिले पुन्हा दमदार भाषणासाठी बळ

दादाची एक खासियत होती की विरोधी पक्षाचे काम करणारा एक नेता कणखर म्हणून दादांकडे राज्य बघत होतं.. ही भाषण जी कानावर येतात हे खूप आश्चर्य आहेत. मला माहितीये हे अजित दादा नाहीत. दादाला कुणी असं बोलायला लावता का यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकांनी विचार, काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं मत आहे. पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं. बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि मी त्या कामासाठी लागली आहे.

ही चांगली गोष्ट आहे मनापासून स्वागत करते. भाजप अपयश प्रश्नाचं आहे त्यांना पालिकेत दिसून येत आहे. माझा काय संबंध आहे. एसटीपी करायचं काम मी करायचं का पालिकेने करायचं? तसा असेल तर सगळा आम्हाला द्या आम्ही सगळे प्रश्न सोडू… कार्पोरेशनची विधानसभेची आणि लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे द्या मी प्रश्न पाच वर्षात सोडवून दाखवतो. मतदार खूप हुशार आहे. कुठलं काम केंद्राचा आणि कुठलं काम राज्याचा आहे हे त्यांना माहिती आहे. माझ्या विरोधात बोलायला दुसरं काहीच नाही त्यामुळे हे बोलत आहेत काही का असेना माझ्या आजूबाजूला इलेक्शन चालू आहे, याचा मला आनंद आहे.

नगरच्या रणांगणात ‘एमआयएम’ची एन्ट्री; डॉ. परवेज अशरफींकडून उमेदवारी अर्ज दाखल

पुढे म्हणाल्या की, पुण्यासह राज्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे पालिकेच्या निष्क्रिय कामामुळे पुण्यातील पाणी, कचरा, ट्राफिक प्रश्न सुटले नाही. भाजपची एक हाती सत्ता असूनही काम नाही, हे त्यांचं अपयश आहे. पाण्याची परिस्थिती सगळेच भोगत आहेत. त्यांना पवार साहेबांना संपवायचा आहे. चंद्रकांत दादा ही आले होते ना बारामतीला .हे सगळे षडयंत्र आहे पवार साहेबांना संपवायच. जी जी कृती चालली आहे ती शरद पवारांना त्रास देण्यासाठी आणि संपवण्यासाठी आहे. हा एकच कार्यक्रम घेऊन कामाला लागले आहेत.

पवार साहेब स्वतःच मानतात पुरावा कशाला पाहिजे देवेंद्रजी स्वतःच म्हणतात की मी दोन पक्ष फोडले.. शरद पवारांचे नाव घेतले की हेडलाईन होते. तो जर आनंद त्यांना मिळत असेल तर तो का घ्यायचा आपण त्यांच्याकडून असे यावेळी म्हणाल्या. पुढे राज ठाकरे यांच्या बारामतीत सभेबाबत म्हणाल्या की, अतिथी देवो भव…सगळ्यांच स्वागत होईल आपल्या मतदारसंघात आणि प्रत्येकाचे स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल असे यावेळी म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube