Ajit Pawar : अर्धांगिनीसाठी अजितदादा दगडूशेठ चरणी लीन; पाहा दाम्पत्याचे खास फोटो

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी गाजणार आहे. कारण सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे.

या दरम्यान अजित पवार हे बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

सध्या पत्नीच्या प्रचारात व्यस्त असलेले अजित पवार प्रत्येक ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. त्याच वेळी ते अर्धांगिनीसाठी दगडूशेठ चरणी लीन झाल्याचंही पाहायला मिळालं.

यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दाम्पत्यासोबत दिपक मानकर, प्रदीप देशमुख हे मान्यवर देखईल उपस्थित होते.
