अजितदादा ‘कचाकचा’ तून सुटले; क्लिनचिट देत EC ने दिले पुन्हा दमदार भाषणासाठी बळ

  • Written By: Published:
अजितदादा ‘कचाकचा’ तून सुटले; क्लिनचिट देत EC ने दिले पुन्हा दमदार भाषणासाठी बळ

पुणे : पाहिजे तेवढा निधा देतो मात्र, त्यासाठी कचाकचा बटण दाबा या अजितदादांच्या विधानावरून चांगलाच गदारोळ झाला होता. या विधानाविरोधात अजित पवारांविरेधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतोय की काय? असे वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) दादांच्या कचाकचा विधानावर पटापटा सूत्र हलवत त्यांना पटकन क्लिनचिट दिली आहे. क्लिनचिटची एकप्रत राज्य निवडणूक आय़ोगालादेखील पाठवण्यात आली आहे. (Ajit Pawar Gets Clean Chit In Controversial Statement On EVM By EC )

‘शिर्डी’च्या आजी-माजी खासदारांना आव्हान; कोण आहेत वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते?

नेमकं काय घडलं होतं? 

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थितांना कचाकचा बटण दाबा असं विधानअजित पवारांनी (Ajit Pawar) केले होते.  इंदापूर येथे डॉक्टर आणि वकिलांना संबोधित करताना अजितदादा तुम्हाला हवा तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकड तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता त्यांना या प्रकरणात क्लिनचिट देण्यात आली आहे.

राहुलला आमचं घड्याळ हाती घ्यायला सांगा, उद्या मंत्री करतो, भरसभेत अजित पवारांची राहुल कुलांना मोठी ऑफर

अजितदादांकडून आचारसंहितेचा भंग नाही

प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही अस कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले असून, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.

Lok Sabha Election : पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांकडे कोट्यवधींची संपत्ती, कर्जाचा आकडाही मोठा

विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawawr) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक अजितदादांवर टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर याबाबत अजितदादांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘खटाखट खटाखट’ गरिबी हटाव असे विधान केले होते. त्यामुळे मी ग्रामीण भागात प्रचलित असलेला ‘कचाकचा’ हा शब्द प्रयोग केला. त्यात ‘एका शब्दाचा उगाच बाऊ करण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube