रीलस्टार तरुण निघाला ऑनलाइन फसवणुकीचा मास्टरमाईंड; 10 कोटी 74 लाख रुपये उकळले!

Pune Cyber Crime साबीआय अधिकारी असल्याचे सांगून रिलस्टारने पुण्यातील 80 वर्षीय नागरिकाकडून जवळपास 10 कोटी 74 लाख रुपये उकळले.

Digital Arrest Scam

Digital Arrest Scam

Reel Star Arrested in 10.74 Crore Digital Arrest Scam in Pune: पुणे सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. रोहन रामेश्वर जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला रोहन बीएससीपर्यंत शिकला असून सोशल मीडियावर रिल्स बनवत होता. मात्र, तो आता सायबर फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.

तीन मित्र आणि गोंधळाची भन्नाट सुरुवात! ‘मांजर’च्या पोस्टरने वाढवलं कुतूहल 18 सप्टेंबरला होणार गोंधळाचा उलगडा

या टोळीने एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तुमचे बँक खाते गंभीर गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यासाठी वापरले गेले आहे, तसेच तुम्हाला आणि कुटुंबीयांना अटक होऊ शकते, अशी खोटी माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकावर मानसिक दबाव टाकण्यात आला.

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून केली फसवणूक

23 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले. त्यानंतर सायबर भामट्यांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधला.

नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला

तुमच्या खात्याविरोधात 24 तक्रारी दाखल झाल्या असून त्याचा वापर गुन्हेगारी व्यवहारांसाठी झाल्याचा दावा आरोपींनी केला. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला सतत मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. अटक टाळायची असेल तर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. या प्रकारे आरोपींनी तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपये उकळले.

5,436 बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार उघड

प्रकरणाचा तपास करताना पुणे सायबर पोलिसांना तब्बल 5,436 बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 34 लाख रुपये गोठवले आहेत.

दहावीचा टॉपर बनला बनावट आयएएस; 100 कोटींची फसवणूक, अंबानींसारखे आलिशान घर अन् टेस्ला कार

दरम्यान, 30 जानेवारीला एका बँक खात्यात 75 लाख रुपये जमा झाल्याचे तपासात आढळले. त्यापैकी 6 लाख 50 हजार रुपये अन्य तीन खात्यांमध्ये वळवण्यात आले होते. बँक व्यवहार, सायबर क्राइम पोर्टलवरील माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी रोहन जाधवचा माग काढला आणि पिंपळे गुरव परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

रीलस्टारसह पाच जणांना अटक

या प्रकरणात रोहन जाधवपूर्वी हर्षद सुभाष धनतोले (26), समर्थ देशमुख (24), अमर अत्तरगी (24) आणि प्रणव करणसिंग आर्या (31, दिल्ली) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान या टोळीशी संबंधित देशभरातील 29 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ताडदेव घरविक्री वादाला नवं वळण; ‘मांसाहाऱ्याला घर नको’ म्हणणारा मालक मराठीच!

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तींचे फोन, ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी किंवा सीबीआय आणि पोलिस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींच्या दबावाला बळी पडू नये, तसेच कोणालाही बँक खात्याची माहिती किंवा पैसे देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version