Pune Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात चार दिवसापूर्वी होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मुत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. तर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना राज्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका (Kavadipat Toll Gate) जवळील होर्डिंग कोसळली (Hoarding Collapse) आहे. लोणी-काळभोरमध्ये (Loni-Kalbhor) हे होर्डिंग कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत होडींग खाली उभा असलेला बँड पथकातील घोडा गंभीर जखमी झाला आहे तर याच बरोबर अनेक गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज दुपारी पुणे शहर आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी लोणी-काळभोरमध्ये हे होर्डिंग कोसळले. जवळच एक लग्नकार्य सुरु होता, त्यामुळे बँड पथक या होर्डिंगच्या बाजूला उभे होते मात्र अचानक होर्डिंग पडल्यामुळे होर्डिंग खाली उभा असलेला घोडा जखमी झाला तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
… म्हणून उद्धव ठाकरेंना मिरची झोंबली, ठाण्यात देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
मुंबईतील घाटकोपर परिसरात चार दिवसापूर्वी होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मुत्यू झाला होता त्यानंतर प्रशासनाकडून राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्यात येत आहे.