Ghatkopar Hoarding Collapse : IPS अधिकारी कैसर खालिद यांचं अखेर निलंबन
Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapse) एक मोठी बातमी समोर आलीयं. या प्रकरणी आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर आलीयं. कैसर खालीद हे रेल्वे सीपी पदावर कार्यरत होते, त्यांनी घाटकोपर परिसरात होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती.
जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले
होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारकडून मोहम्मद कैसर खालिद यांच्यावर कारवाई करण्यात आलीयं. खालिद यांनी डीजीपी कार्यालयाच्या मंजुरीशिवाय होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. यामध्ये प्रशासनाची चूक असल्याचं दिसून आलं त्यामुळे खालिद यांच्यावर कारवाई करण्यात आलीयं. डीजीच्या रिपोर्टनूसार खालिद यांनी होर्डिंग धोका लक्षात न घेताच 120X140 फूटाचे होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. त्यांच्यावर आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलायं. या दुर्घटनेप्रकरणी खालिद यांच्यावर झालेल्या कारवाईनूसार जोपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय तोपर्यंत त्यांना निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्ते देण्यात येणार आहेत.
Stree 2 चा टीझर आउट! राजकुमार राव बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला तर ७४ लोकांना वाचविण्यात आले होते. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दुर्घटनेप्रकरणी शहरातील पंतनगर पोलीस ठाण्यात जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राज्य सरकारच्या मालकीच्या जागेत हा अनधिकृत होर्डिंग लावण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात आणखीही काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली होती.