अहमदनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई, महापालिका आयुक्तांचा इशारा

अहमदनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई, महापालिका आयुक्तांचा इशारा

Action Unauthorized Hoarding : अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार आहे. परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चर ऑडिटचे कागदपत्र सादर करावेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला आहे.

 

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार ?

खबरदारीचा उपाय

नुकतेच मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटननंतर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने आदेश काढत होर्डिंगवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरात विविध भागांमध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत. तसंच, स्ट्रक्चर ऑडिट न झाल्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची खबरदारी घेत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

वादळी वाऱ्यामुळे राज्यात पुन्हा होर्डिंग कोसळलं, अनेक गाड्यांचे नुकसान

अधिकृत होर्डिंगची पाहणी

शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने तातडीने होर्डिंग मालकाची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्राची पूर्तता करावी. अन्यथा, कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला आहे. मनपा आयुक्तांनी एक समिती नेमली असून त्या समितीद्वारे शहरातील अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंगची पाहणी करण्यात येत आहे. तसंच, याबाबतचा अहवाल सदर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube