Pune Morphed Photo Viral : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसर (Hadapsar) परिसरात असणाऱ्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना 16 जून ते 30 जून 2024 दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तीन अल्पवयीन मुलांनी टेलिग्राम (Telegram) बॉट मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून अल्पवयीन मुलींचे मॉर्फ फोटो तयार केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केले.
या प्रकरणात हडपसर पोलिस ठाण्यात 36 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात POCSO आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील शिक्षकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
UPI मध्ये बदल, बँक खात्याशिवाय होणार पेमेंट, ‘या’ लोकांना मिळणार फायदा
ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आला असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
‘लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजना’ सुरु करा, MPSC व IBPS परिक्षांवरून अतुल लोंढे सरकारवर भडकले